Header Ads Widget

Responsive Advertisement

अ भा बौद्धधम्म परिषद चांदापुर येथे 26 जानेवारी रोजी होणार !!


धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा -स्वागताध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे
अंबाजोगाई // परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दि
26 जानेवारी  2019 रोजी सकाळी 10 वाजता पाचव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परीषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो
(पुर्णा),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), पुज्य भिक्खू पय्यारत्न (नांदेड),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन संदीप हनुमंतराव उपरे (राज्याध्यक्ष,ओबीसी परिषद,म.रा.) व धम्म परिषदेचे संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व राजेंद्र घोडके आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे शनिवार,दि
26 जानेवारी  2019 रोजी होणार्‍या पाचव्या अ भा  बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे संपन्न होणार्‍या पाचव्या धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 9 वाजता पंचरंगी धम्मध्वजारोहणाने होईल.स्वागताध्यक्षपदी
सामाजिक कार्यकर्ते संदीप हनुमंतराव उपरे (राज्याध्यक्ष,ओबीसी परिषद,म.रा.) हे असणार आहेत.या धम्म परिषदेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार 2017-18 प्राप्त केशव गोरोबा कांबळे(लातूर) आणि ञिवेणीताई कसबे-पोटभरे(संयोजक,बुध्द सृष्टी विपश्यना केंद्र, कळंब) या मान्यवरांचा विशेष सत्कार होईल.या परीषदेच्या अध्यक्षस्थानी नालंदा अकादमीचे अध्यक्ष आयु.चंद्रशेखर वडमारे (अंबाजोगाई) तर यावेळी धम्मपीठावर आयु.अॅड.अनंतराव जगतकर (अध्यक्ष,डॉ.
बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी),
प्रा.प्रदिप रोडे (अध्यक्ष,
माता रमाई पतसंस्था, बीड),आयु.सचिन कागदे (नगरसेवक, न.प.सदस्य,परळी वै.),सरपंच आयु.भामाबाई किसन हनवते (चांदापुर),सरपंच डी.एस.राठोड (वसंतनगर तांडा), सरपंच मनोहर केदार (रेवली),प्रा.डॉ.विनोद जगतकर (परळी वै.) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.संयोजन समितीने चांदापुर येथे होणार्‍या या धम्म परिषदेची सर्व तयारी पुर्ण केली आहे. वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द,अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तरी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी जनतेने पांढरे वस्ञ परिधान करूनच या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत इंगळे,राजेंद्र घोडके,राहुल घोडके, जगन सरवदे,सचिन वाघमारे,विश्वनाथ भालेराव,सिमा चंद्रकांत इंगळे,सुरेखा प्रल्हाद रोडे,संयोजन समितीचे प्रा.गौतम गायकवाड, मुरलीधर कांबळे (बौध्दाचार्य),अर्जुन वाघचौरे,माणिक रोडे, मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे,मिलींद नरबागे, राज जगतकर,प्रभाकर बडे,प्रा.बी.एस.बनसोडे,राजाभाऊ घाटे,संजय साळवे (पुस),दयानंद सावळे,सुरेखा रोडे, अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे,धनंजय जोगदंड,सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड, रूक्मिण गोरे,संदीप वैद्य,प्रसिध्दीप्रमुख
प्रा.बालाजी जगतकर,आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments