Header Ads Widget

Responsive Advertisement

हेल्मेट सक्तीपूर्वी पोलीस प्रशासनाने जनजागृती करावी - डॉ. संतोष मुंडे


परळी वैजनाथ // नुकताच पोलीस प्रशासनाने   हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हा निर्णय चालकांची सुरक्षा बघता निश्चितचं स्वागतार्ह आहे. पण, लगेचचं निर्णयाची अंमलबजावणी करत ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना दंड आकारू नये. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच यासाठी पुरेसा कालावधी नागरिकांना द्यावा त्यानंतर जर कोणी नियम मोडला तर त्या दंडातून वसूल रकमेतून हेल्मेट द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या आठवड्यात बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुचाकी वाहन चालकांच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे स्वागत करत यासाठी योग्य तो कालावधी नागरिकांना हेल्मेट खरेदीसाठी द्यावा अन्यथा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडेल असा कडक इशारा डॉ. संतोष मुंडेंनी दिला आहे.

सध्या बीड जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. अशा परिस्थितीत हेल्मेटसाठी लागणारी रकमेची तरतूद करायला वेळ लागणार आहे. तसेच बाजारपेठेत इतक्या मोठ्या संख्येने हेल्मेट उपलब्ध नाहीत. तरीही पोलीस प्रशासन सक्तीने दंड आकारताना निदर्शनास आले आहे. मुळात कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात असा निर्णय लादणे योग्य नाही त्यामुळे जनतेला वेठीस धरल्यासारखे होईल आणि पोलिसांना जनक्षोभाला सामोरे जावे लागेल त्यामुळे प्रशासनाने पुढील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना हेल्मेट खरेदीसाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही डॉ. संतोष मुंडेंनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments