Header Ads Widget

Responsive Advertisement

पोलीस ठाणेदार प्रवीण मुंडे यांचा संकल्पनेतून ठाण्याचा बदलला चेहरा-मोहरा

वर्ध्यातील समुद्रपूर पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकनाचा दर्जा


वर्धा // पोलिसांप्रती जनतेच्या मनातील असलेली नकारात्मक भूमिका बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन हे चित्र बद्दलविण्याचे काम सध्या सुरू आहे. भविष्यातही स्मार्ट पोलीस ठाणे या संकल्पनेत उतरण्याचे आव्हान आहे. त्यामुळे लवकरच तो टप्पा गाठू, असा मानस येत्या काळात असल्याचे ठाणेदार मुंडे यांनी ईनाडू इंडियाला बोलताना सांगितले. यावेळी आयएसओ मानांकन दर्जा प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, नागराध्यक्ष गजानन राऊत, आयएसओ प्रदान करणारे मुंबई टेक्नो आर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीबाश दत्ता, एसडीपीओ भीमराव टेळे, हिंगणघाट पोलीस निरिक्षक सत्यजित बंडीवार, समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांनी पोलीस ठाण्याची पायरी चढू नये, अशी म्हण आहे. परंतु, याला समुद्रपूर पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. कारण या पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळाला आहे. २ वर्षांच्या अथक परिश्रमातून कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजगुरुनगर पोलीस ठाणे सजले.
या पोलीस ठाण्यात मागील २ वर्षात अनेक सुधारणा झाल्या आहेत. या पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेली हिरवीगार झाडे, लहान मुलांना खेळायला साहित्य, तहान भागवण्यासाठी शुद्ध थंड पाणी. त्यामुळे हे पोलीस ठाणे जणू काही एखादा बगीचाच असल्यासारखे वाटते. परंतु, हे सगळे चित्र निर्माण करायला तब्बल २ वर्षाचे परिश्रम घ्यावे लागले. पोलीस ठाणेदार प्रवीण मुंडे यांचा संकल्पनेतून हा चेहरा-मोहरा बदलला आहे.

समुद्रपूर पोलीस ठाण्याला  स्मार्ट पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी कोणीही पाऊल टाकले नाही. परंतु, याला ठाणेदार प्रवीण मुंडे अपवाद ठरले. त्यांनी कर्मचाऱ्यांना हवे-हवेसे वाटणारे पोलीस ठाणे तयार केले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी यावेळी सांगितले, की पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराच्या समस्यांचे निराकरण करावे आणि त्यांना चांगली वागणूक द्यावी. पोलीस ठाण्याला आयएसओ हे मानांकन देताना अनेक बाबी तपासल्या जातात. नियम आणि अटींची पूर्तता केल्यानंतर हे मानांकन दिले जाते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आयएसओ मानांकन मिळणारे पूर्व विदर्भातील हे पहिलेच पोलीस ठाणे आहे. यात आणखी काही बदल अपेक्षित आहेत. ते हळूहळू पूर्ण होतील, अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर टेक्नो आर्ट कॉर्पोरेट कॉलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे श्रीबास दत्ता यांनी
 दिली .

Post a Comment

0 Comments