Header Ads Widget

Responsive Advertisement

झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला मी पंढरपुरात आलो

सोलापूर // शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस शिवसेनेनं दाखवलंय, असे म्हणून उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  त्यानंतर, त्यांनी मित्रपक्ष भाजपावर जोरदार टीका केली. देशातील पाच राज्यात भाजपाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला मी पंढरपुरात आलो आहे. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही, अशा शब्दात भाजपा अन् मोदींना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन

समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी.

कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो.

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच

जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो

सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

Post a Comment

0 Comments