मुंबई // सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी 31 डिसेंबर रोजी मनोरंजन आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठीची सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या खुली ठेवण्यात यावीत, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. काही दिवसांतच आपण वर्ष 2018ला बाय-बाय करुन नवीन वर्ष 2019चं थाटामाटात स्वागत करणार आहोत. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी तयारीला लागला आहे. थर्टी फर्स्ट जल्लोष साजरा करताना सर्वसामान्यांसाठी वेळेचे बंधन असू नये, यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
''मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे यांसारख्या अनेक शहरवासीयांना नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर कायदेशीर मनोरंजनाची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणं विशेषतः अनिवासी भागातील ठिकाणे रात्रभर खुली ठेवावीत'', असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.




0 Comments