ना पंकजाताई मुंडे यांनी केले बीड पोलिसांचे अभिनंदन
मुंबई // ऑनर किलींग हे समाजासाठी घातक असून असे गुन्हे खोटया प्रतिष्ठेपायी घडतात आणि त्यात निरपराधांचा जीव जातो. विवाह हा प्रत्येकाचा आपापला अधिकार आहे, एखाद्या व्यक्तीने त्याच्या पसंतीने विवाह केला तर त्याच्या पाठिमागे उभे रहावे अन्यथा त्याचा जगण्याचा अधिकार तरी काढून घेवू नये असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. बीड येथे झालेल्या सुमित वाघमारे हत्या प्रकरणातील आरोपींना जेरबंद केल्याबद्दल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी बीड पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
सुमित वाघमारे यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती पोलिसांनी संयमाने हाताळली आणि वेगाने तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले याबद्दल पोलिस अधीक्षक व त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करते असेही ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.
••••


0 Comments