Header Ads Widget

Responsive Advertisement

धर्मापुरी येथील 900 वर्षे जुन्या मंदिरास पुरातत्व विभागामुळे आली झळाळी


ऐतिहासिक केदारेश्वर मंदिरात  प्रमदा,चंचलता,प्रथुला, मदालासा, गजगामिनी,असे चित्तवेधक शिल्पे

 गोपाळ आंधळे

परळी// कल्याणी वंशातील चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा)या राजाने बाराव्या शतकाच्या आरंभी हे मंदिर बांधले. हे मंदिर पश्चिमाभिमूख असून एक मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूला दोन अर्धमंडप आहेत. गर्भगृहात सुंदर पाषाणाचे मोठे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाह्य भाग पाषाण शिल्पकुंजानी विलक्षण शोभनिय आहे.
विविध हिंदू देवतांची शिल्पेही अजोड आहेत. त्यांची प्रमदा, चंचलता,प्रथुला, मदालासा, गजगामिनी,असे चित्तवेधक शिल्पे पाहाणारास घायाळ केल्याशिवाय राहत नाहीत.
अशा या ऐतिहासिक ठेव्याची दुर्दशा झाली होती.  अनेक  वर्तमान पञाचा माध्यमातून  या मंदिराच्या दुर्दशेबाबत वाचा फोडली होती.
स्थानिक लोकांच्या व माध्यमांच्या पाठपुराव्या मुळे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या निगराणी खाली धर्मापुरी येथील ऐतिहासिक केदारेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू आहे.

परळी तालुक्यास मोठा धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्रभू वैद्यनाथ व माता पार्वती यांच्या वास्तव्याने पुनित असलेल्या परळी पंचक्रोशीत असंख्य अशी ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणे आहेत. जी अजून ही जिर्णोउध्दाराच्या प्रतिक्षेत आहेत.
अशा एकुण 42 ठिकाणांचा माहीती पट मी केलेला आहे.
तो आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर पाहता येऊ शकतो.
https://youtu.be/NvuGSruAgtk
https://youtu.be/Az0z67iOxwA
https://youtu.be/P4-H2FlfNxY


Post a Comment

0 Comments