Header Ads Widget

Responsive Advertisement

आपुलकी आणि मायेची चादर देण्याचे काम मी आयुष्यभर करीत राहणार ...!! ना.धनंजय मुंडे



गुरूदास सेवा आश्रमात कपडे आणि फराळाचे वाटप


परळी //  वृध्दाश्रमात राहणार्‍यांना त्यांच्या पालकांनी एकटे सोडले असले तरी मी त्यांचे पालकत्व आता घेतले आहे. केवळ आश्रमाला आर्थिक मदत करणे, त्यांना दैनंदिन लागणार्‍या गोष्टी देणे पेक्षा ही त्यांना या वयात आवश्यक असणारी आपुलकी आणि मायेची चादर देण्याचे काम मी आयुष्यभर करीत राहणार असल्याचे ना.मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे असलेल्या गुरूदास सेवा या वृध्दाश्रमात येथील वृध्द मंडळींसोबत दिवाळीचा सण साजरा केला. त्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ घेताना त्यांना ही नविन कपडे तसेच हिवाळ्यासाठी लागणार्‍या गरम कपड्यांचे वाटपही करण्यात आले.

परळीपासुन जवळच असलेल्या घाटनांदुर येथील गुरूदास सेवा आश्रमात अनेक वृध्द महिला, पुरूष, निराधार राहत आहेत. या आश्रमाचे पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्विकारले असुन आज दिवाळी भाऊबीजीचे औचित्य साधत त्यांनी आश्रमाला भेट देवुन या वृध्द मंडळीं समवेत दिवाळीचा फराळ केला. त्यांच्याशी आस्थेवाईक पणे चर्चा केली तसेच वृध्द महिलांना साडी-चोळी, पुरूषांना धोती-कपडे, टॉवेल, हिवाळा असल्याने चादर असे गरम कपड्यांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या तर्फे कै.पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या हायमास्ट दिव्यांचे लोकार्पणही यावेळी ना.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याकार्यक्रमास आश्रमाचे उपाध्यक्ष नरहरी मंठेकर, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, सरचिटणसी सुरेश टाक, बाजीराव धर्माधिकारी, अध्यक्ष नामदेव महाराज, ज्ञानोबा बप्पा जाधव, शिवाजीराव सिरसाट, मच्छिंद्र वालेकर, बाळासाहेब देशमुख, बाबुराव जगताप सर, बन्सीधर जाधव, गणेशभैय्या देशमुख, ओमसेठ सारडा, बाळासाहेब राजमाने, अ‍ॅड.मनजित सुगरे, शेख मुर्तजा, पांडुरंग मिसाळ, उत्तम शिंगाडे, परमेश्वर कांबळे, यशवंतराव गित्ते, केशवराव आघाव, आनंत इंगळे, पत्रकार विश्वजित गंडले, संजय राणभरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments