वार्ताहरांनी केलेल्या कामाचे यश हे वृत्तपत्र वितरकांवर अवलंबून -बाजीराव भैय्या धर्माधिकारी
वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय नसूून ते समाजसुधारणेचे घेतलेले व्रत आहे – चंदुलाल बियाणी
परळी वैजनाथ// ऊन, वारा, पाऊस आदींसह अनेक गोष्टींची तमा न करता वृत्तपत्र वितरक वर्तमानपत्रांना प्रत्येक घरात पोचवत असतात. त्यांना ना सुट्टी असते, ना विसावा… प्रत्येक दिवसाच्या भल्या पहाटे उठून घराघरात वृत्तपत्र पोचवणार्या परळीतील वृत्तपत्र वितरकांचा परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला. परळी संपादक संघाचे अध्यक्ष बालासाहेब कडबाने, मार्गदर्शक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, संपादक रामप्रसाद गरड, बाळकिशन सोनी, प्रशांत प्र.जोशी यांच्या हस्ते उपस्थितांना भेटवस्तू देण्यात आल्या.
परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने व शहराध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या संकल्पनेतून वृत्तपत्र वितरकांचा गौरव सोहळा परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दै.जगमित्र कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी संपादक संघाचे अध्यक्ष बालासाहेब कडबाने तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संपादक चंदुलाल बियाणी, रामप्रसाद गरड, बाळकिशन सोनी, ज्ञानोबा सुरवसे, शिवशंकर झाडे, प्रशांत प्र.जोशी आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलतांना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, वृत्तपत्र चालवणे हे अत्यंत जिकीरीचे काम असून, दररोज तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच संपादक आणि वार्ताहरांनी केलेल्या कामाचे यश हे वृत्तपत्र वितरकांवर अवलंबून असते, प्रत्येक घरा घरात पेपर पोचल्यानंतरच केलेल्या कामाचे चिज होते. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर पत्रकारांचा मित्र म्हणून या कार्यक्रमास उपस्थित आहे असे ते म्हणाले.
दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय नसूून ते एक समाजसुधारणेचे घेतलेले व्रत आहे. आधुनिकीकरणाच्या काळात वाढलेल्या महागाईमुळे आणि शासनाच्या काही चुकलेल्या धोरणांमुळे वृत्तपत्रांची गळचेपी होत आहे. त्यातच संघर्ष करून टिकलेल्या वृत्तपत्रांचे यश हे वितरकांवर अवलंबून असल्याने परळी पत्रकार संघाने त्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतूक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने यांनी तर सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी मानले. तद्नंतर संपादक संघाचे अध्यक्ष बालासाहेब कडबाने यांच्या वतीने आयोजित दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घेतला.
आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास परळी पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, प्रकाश चव्हाण, प्रा.प्रविण फुटके, जगदिश शिंदे, इंजि.भगवान साकसमुद्रे, किरण धोंड, अनंत कुलकर्णी, महादेव शिंदे, महादेव गित्ते, संतोष जुजगर, संजीब रॉय, सुकेशिनी नाईकवाडे, संतोष बारटक्के, नरसिंग अन्नलदास, कृष्णा कडबाने यांच्यासह संजय लुंकड, अजय पुजारी, आनंद हाडबे, धिरेंद्र अवस्थी, अनिल गायकवाड यांच्यासह परळी शहरातील सर्व वृत्तपत्र वितरकांची मोठी उपस्थिती होती.

0 Comments