Header Ads Widget

Responsive Advertisement

सेनाजिल्हा प्रमुखांनी एकतर्फीपणे केलेल्या निवडींचा आम्ही परळीचे शिवसैनिक निषेध करतो


परळी //कामाचे कोणतेही मूल्यमापन न करता आणि ज्येष्ठता लक्षात न घेता या निवडी जिल्हा प्रमुखांनी एकतर्फीपणे केल्या असून, या निवडींचा आम्ही निषेध करत आहोत. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणारे आणि निवडणुका लढवणारे आज पदाधिकारी झाले आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना का डावलले? शिवसेनाजिल्हा प्रमुखांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता . निवडी केल्या असून एकप्रकारे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीलाच प्रोत्साहन देण्याचा प्रकार असल्याचे पत्रकार परिषदेत  शिवसैनिकांनी व्यक्त केले .
परळी वैजनाथ येथे  शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुखांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली असून भोजराज पालीवाल यांनी नव्याने मिळालेल्या तालुका समन्वयक पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. वरिष्ठांकडे अद्याप राजीनामा पाठवला नसून, पदाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेस भोजराज पालिवाल, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे, रवींद्र परदेशी, माजी तालुका प्रमुख नारायण सातपुते, विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख महेश केंद्रे, माजी नगरसेवक संजय कुकडे, माजी उपशहर प्रमुख सचिन स्वामी, बालासाहेब देशमुख, नरहरी सुरवसे, सचिन लोढा, शिवाजी दराडे, विशाल सुगरे, संजय गावडे, प्रकाश साळुंके, रवी गौड आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments