परळी-वैजनाथ // संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. परळी वैजनाथ प्रणीत छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचे बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
वडसावित्रीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव मतदारसंघाचे आ.आर.टी.देशमुख उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बीडचे माजी नगराध्यक्ष श्री चाऊस, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताप्पा ईटके, संचालक डॉ.हरिश्चंद्र वंगे, वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख,वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष विकासराव डुबे,म.रा.सं.पनन महासंघाचे संचालक ऍड.विष्णूपंत सोळंके, कल्याणकारी बहुद्देशीय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेश टाक, नगरसेवक पवन मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे संत तुकाराम भाडेकरू मालकी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके सर यांनी स्वागत केले. यावेळी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी वडसावीत्रीनगर भागाच्या विकासासाठी खासदार फंडातुन निधी देण्याचे आश्वासन देवुन छ.संभाजी महाराज व्यायामशाळेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे सचिव वसंत सुर्यवंशी, उपाध्यक्ष वैजनाथ सोळंके, वैजनाथ भास्कर, कोषाध्यक्ष संजय देशमुख, संचालक सुभाष नानेकर, लक्ष्मण चव्हाण, रणजीत सोळंके, राजेश ठोंबरे, सुनिल देशमुख, दिनेश कापसे, श्रीराम गरड, नागेश गवळी, भगवान कळसे, बालासाहेब जगताप, सौ.ज्योती मराठे, सौ.सविता टाक यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments