'
● १९ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सभासद शेतकर्यांना भावनिक साद ●
परळी वैजनाथ । प्रतिनिधी
आपल्या भागाच्या अर्थिक विकासाचा मुख्य स्त्रोत असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उभारणीपासून आपल्या अपत्याप्रमाणे जीवापाड जपला. परंतु गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे उस उत्पादक शेतकरी व कारखानाही आवघड परिस्थितीतून जात आहे. या सर्व विपरीत परिस्थितीतही ना. पंकजाताई मुंडे यांनी धिरोदात्तपणाने शेतकरी, सभासदांना सांभाळलेले आहे. या वर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा विपरीत परिस्थितीचा आपण सर्व मिळून सामना करून या हंगामात वैद्यनाथ चे यशस्वी गाळप करुया अशी भावनिक साद खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी सभासद शेतकर्यांना घातली.१९ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज (दि. 5 नोव्हेंबर) खा. डॉ. प्रितमताई मुंडे, पन्नगेश्वर शुगर मिलच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञाताई मुंडे यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. प्रारंभी होमहवन करुन मान्यवरांच्या हस्ते गव्हानीत उसाची मोळी अर्पण करण्यात आली.कार्यक्रमास आ.आर.टी.देशमुख, आ.प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सविता गोल्हार, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, पन्नगेश्वर शुगर मिलचे उपाध्यक्ष किशनराव भंडारे, वैद्यनाथ चे व्हा. चेअरमन नामदेव आघाव , भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डाॅ. शालिनी कराड आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी सांगितले की, 19 व्या गळीत हंगाम च्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी आई आवर्जून उपस्थित आहेत.ज्यांच्या पायात लक्ष्मी आहे अशा व्यक्तीमत्वाला आपण कार्यक्रमाच्या अध्यक्ष केले त्यामुळे कारखान्याला या विपरीत दुष्काळी परिस्थितीतही चांगले दिवस नक्कीच येतील. संपूर्ण जिल्ह्यात एक नाही दोन नाही तब्बल पाच वर्षे आपण सर्व अवर्षणाचा आणि दुष्काळाचा सामना करत आहोत. या पार्श्वभूमीवर मोळी टाकण्याचा कार्यक्रम आपण साधेपणाने करत आहोत.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ना. पंकजाताई यांनी अनेक संघर्षांना तोंड देऊन शेतकरी, शेतमजूर, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने बजावली आहे. केवळ राजकारणातील प्रतिस्पर्धीच नाही तर निसर्गाने अवकृपा केलेली असताना सुद्धा या परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून फायदा होईल यासाठी अविरत काम केले आहे. वैद्यनाथ कारखाना हा साहेबांनी अपत्याप्रमाणे जीवापाड जपला.त्यामुळे या विपरीत दुष्काळी परिस्थितीचा सामना आपण सर्व जण मिळुन करण्याचा संकल्प केला पाहिजे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी 'वैद्यनाथ'चे यशस्वी गाळप करण्यासाठी आपण सर्व मिळून विपरीत दुष्काळी परिस्थितीचा सामना करु यासाठी सहकार्य करावे असे भावनिक आवाहन त्यांनी शेतकरी, सभासदांना केले.
यावेळी प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस. के. दिक्षीतुलू यांनी केले. कारखान्याने सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या असून या वर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी येणाऱ्या उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. व्हा. चेअरमन नामदेव आघाव यांनी प्रोग्राम प्रमाणे सर्वांचा उस गाळपासाठी आणण्यासाठी कारखाना प्रयत्नशीलआहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आ. आर. टी. देशमुख यांनी सांगितले की, लोकनेते मुंडे साहेबांनी ज्या वैभवाने कारखाना चालवला त्याच पद्धतीने ना. पंकजाताई मुंडे यांचीही तळमळ आहे. नैसर्गिक संकट उभे राहिले तरी ना. पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होईल अशी भुमिका आहे. तर आ. संगीता ठोंबरे यांनी कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे सातत्याने प्रयत्न करत असून या मध्ये त्यांची पाईक म्हणून सदैव काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री पांडुरंग फड, ज्ञानोबा मुंडे, भाऊसाहेब घोडके, माधवराव मुंडे, त्रिंबकराव तांबडे, किसनराव शिनगारे, आश्रुबा काळे, व्यंकट कराड, दत्तात्रय देशमुख, परमेश्वर फड, गणपत बनसोडे, केशव माळी, शामराव आपेट, श्रीमती जमुनाबाई लाहोटी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे स. जनसंपर्क अधिकारी ज्ञानोबा सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक तथा भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व संचालक, सभासद, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

0 Comments