Header Ads Widget

Responsive Advertisement

सामाजिक सहकार्य म्हणून दिवाळीच्या सणानिमित्त चिमुकल्यांसाठी छोटीशी थेट- भेट


पाली//एचआयव्ही’ग्रस्त मुलांना स्वीकारण्याची ‘मॅच्युरिटी’ अजूनही समाजात फारशी आलेली नाही; मात्र तरीही अनेक व्यक्ती, संस्था त्यासाठी झटून कार्य करत आहेत. बीड येथील दत्ता आणि संध्या बारगजे हे दाम्पत्यही त्यापैकीच एक आहे .

भारतात सामाजिक संस्था अनेक आहेत. परंतु अशा संस्था फार कमी आहेत, की ज्या समाजातील सर्वांत जास्त दुर्लक्षित लोकांना अर्थात एचआयव्ही/एड्सबाधित मुले आणि महिलांसाठी काही तरी करत आहेत. ‘एचआयव्ही’बाधित मुलांना अनेक वेळा त्यांचे पालक बस स्टँड, रेल्वे स्टेशन अथवा रस्त्यावर सोडून देतात. यापैकी काही मुले भीक मागताना किंवा उकिरड्यावर अन्न शोधताना दिसतात. आजसुद्धा आपला समाज अशा मुलांचा स्वीकार करायला मनापासून तयार नाही. अशा मुलांना आवश्यक औषधे, अन्न, निवारा, शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेम आणि वात्सल्य देण्याचे काम ‘इन्फंट इंडिया’ संस्थेच्या माध्यामातून केले जाते.

...पण या मुलांना नुसते सांभाळून चालणार नव्हते. त्यांना शिकवायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला. या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत बसू देण्याला विरोध झाला. शेवटी जिल्हा परिषदेने या मुलांना शिकविण्यासाठी आश्रमातच दोन शिक्षकांची नियुक्ती केली.

 या समाजकार्यात खारीचा वाटा म्हणून अंबेजोगाई येथील गोदावरी कुंकूलोळ या कन्या विद्यालयातील मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी यांच्या वतीने आपल्या आयुष्यातील एक क्षण .....थेट-भेट स्वरूपात .
 मायेची ऊब देणारे दत्ता बारगजे यांच्या इन्फंट इंडिया साठी एक दिवस सुखाचा म्हणून सामाजिक सहकार्य म्हणून यांनी दिवाळीच्या सणानिमित्त चिमुकल्यांसाठी छोटीशी थेट-भेट व घासातील घास म्हणून दिवाळी सणानिमित्त ,घरी केलेला गोडधोड फराळाचे पदार्थ त्या चिमुकल्यांसाठी दिले .यावेळी दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी यांचे आभार मानले .यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा जालनेकर, बनसोडे ,के जी.पसारकर ,व्ही .जी .राठोड  आदीजण उपस्थित होते

Post a Comment

0 Comments