● काल्याच्या कीर्तनाने ज्ञानयज्ञ सांगता ●
परळी वैजनाथ // भगवंतांच्या चरित्राचे उच्चारण ही अध्यात्मिक पुण्यप्रद बाब असुन काल्याचा उत्सव हा अनेक संदेश देणारा असतो. खऱ्या अर्थाने भेदाभेदरहित होणे हाच काल्याचा ईश्वरी संदेश असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उखळीकर यांनी काल्याच्या किर्तनसेवेतून केले.
भागवतमर्मज्ञ बाळुमहाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवतकथा गेल्या सप्ताहात भाविकांनी श्रवण केली.भास्कर मामा चाटे यांच्या शिवाजीनगर निवासस्थानी आयोजित अखंड हरीनाम सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.या किर्तनाला सदगुरू अनुराधाताई देशमुख मसलेचौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या सप्ताहात नामवंत कीर्तनकार, गायक,भजनी मंडळ यांचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड उपस्थिती लाभली.
सप्ताह सांगतेनिमित्त सकाळी टाळ मृदंगाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये भाविक, भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपुर्ण सप्ताहात अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. भागवतकथा सांगता, ग्रंथपुजन, व्यासपुजन, गुणीजन गौरव कार्यक्रम पार पडले.भागवतमर्मज्ञ हभप बाळु महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्करमामा चाटे, श्रीकांत चाटे,शशिकांत चाटे, रविकांत चाटे व चाटे परिवाराने अथक परिश्रम घेतले.




0 Comments