Header Ads Widget

Responsive Advertisement

● परळीच्या नाट्यकलावंतांची राज्यस्तरीय रंगमंचावर कसदार अभिनयाची झलक ●

अ.भा.नाट्य परिषद शाखा परळी निर्मित 'सत्यदास' नाटकाची राज्य मराठी नाट्य स्पर्धेत दमदार 'एन्ट्री' !



परळी वैजनाथ // अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी च्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या 'सत्यदास' या नाटकाने महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेत दमदार एंट्री केली असून या माध्यमातून परळीच्या नाट्यकलावंत यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक राज्यस्तरीय रंगमंचावर दाखवून दिली. परळीच्या नाट्य चळवळीतील  हे महत्त्वाचे पाऊल असून अ. भा.  नाट्य परिषद शाखेमुळे स्थानिक कलावंतांना मोठा वाव मिळत आहे. या दमदार कामगिरीबद्दल अ. भा. नाट्य परिषद शाखा परळीचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी कलाकारांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
         महाराष्ट्र शासन कार्य संचालनालयाच्या वतीने औरंगाबाद येथे 58 वि महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित  व मानांकित अशी ही स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी च्या वतीनेही सहभाग घेण्यात आला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पहिला प्रयोग सादर करण्याचा मान परळी शाखेला मिळाला. या राज्यस्तरीय रंगमंचावर परळीतील नाट्यकर्मींच्या कसदार अभिनयाची झलक रसिकांना दिसून आली. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर नाट्य परिषद परळी शाखा निर्मित 'सत्यदास' या नाटकाने दमदार एंट्री केली. प्रेक्षकांना अखंडित खिळवून ठेवणारा अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन व नेपथ्य, उत्तम आशय आणि कसदार अभिनय यामुळे या नाट्यस्पर्धेत 'सत्य दास' नाटकाने नाट्य क्षेत्रातील तज्ञांसह रसिक, नाट्यप्रेमींचे मन जिंकून घेतले. या निमित्ताने नाट्य परिषद शाखा परळीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून नाट्य चळवळीला बळ देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून आले. 'सत्यदास' या परळी शाखेने निर्मित केलेल्या व नाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे यांच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेल्या या नाटकाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्याचबरोबर राज्यस्तरीय रंगमंचावर परळीतील नाट्यकर्मींच्या कसदारअभिनयाची झलक नाट्यक्षेत्रातील सर्वांनाचअनुभवावयास मिळाली.
      'सत्यदास' या नाटकाचे लेखक मनोज महाजन, दिग्दर्शक कल्याण वाघमारे, नेपथ्य राजेश मुंडे, पार्श्वसंगीत माणिक गडदे, दयानंद सरपळे, प्रकाश योजना -सुधीर राजहंस यांची तर यामध्ये कलावंत प्रदीप भोकरे, माधुरी महामुनी दीक्षित, रवी आघव, श्रीकांत कान्हेगावकर, राजेश मुंडे,भरत भांगे, बालाजी खाडे,वैजनाथ फड, अभिषेक खोसे, यशश्री खोसे,प्रतीक्षा खोसे, अर्चना खेडकर,पूजा शिवगण, लखन वाघमारे, असिफ शेख,संदेश शिंदे,नागनाथ पांचाळ आदींनी भुमिका केलेली आहे.
        या यशस्वी वाटचालीचा मनस्वी खुप आनंद वाटत असून आपल्या परळीतील कलावंतांना अधिकाधिक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाट्य परिषद शाखा परळी सातत्याने प्रयत्न करत आहे.  परळीतील कलाकारांना नाट्यक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करता येईल यासाठी येणाऱ्या काळात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या चमूने केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद असून याचा अभिमान वाटतो. नाट्य परिषदेच्या वतीने सर्व नाट्यकर्मींना सदिच्छा असून अधिकाधिक कलेला वाव देण्याचा आपला प्रयत्न राहील. अशी प्रतिक्रिया अ. भा. नाट्य परिषद शाखा  परळीचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments