Header Ads Widget

Responsive Advertisement

तपोवन एक्सप्रेस रेल्वेतुन पाय घसरुन परळीच्या युवकाचा परतूर येथे अपघातात मृत्यू


 परळी वैजनाथ// परळीचे रहिवाशी असलेले शिवा भरडे यांचा परतूर येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजता घडली. भरडे जालन्याहून परळीसाठी येत असताना ही घटना घडली. परतूर येथे तपोवन एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना परतुर रेल्वे स्थानकाजवळ येत असतानाच शिवा भरडे यांचा रेल्वेतुन पाय घसरुन रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाला. हे वृत्त परळी शहरात समजताच गावावर शोककळी पसरली. शिवा भरडे माणिक नगर येथील रहिवासी होते.रविवारी त्यांच्यावर परळी येथील वीरशैव स्मशान भूमीत सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments