Header Ads Widget

Responsive Advertisement

एकमेकांशी असलेला विश्वास व सार्थ अभिमान ,त्या विश्वासार्हताचा परिस स्पर्श म्हणजे आजचा हा विजय आहे ---- डॉ. सुरेश खुरसाळे


अंबाजोगाई// येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या पॅनलनी  ३४१मतांची आघाडी घेत विजय संपादन केला . पू.स्वामी रामानंद तीर्थ, पू.बाबासाहेब परांजपे, पू. भाऊसाहेब चौसाळकर, पू.श्रीधरपंत सोमन आणि पू.नारायणराव जोशी यांच्या विचाराने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या अतिशय प्रतिष्ठित आणि उज्ज्वल इतिहास असणार्‍या योगेश्वरी शिक्षण संस्थेची आज पंचवार्षीक निवडणुक पार पडली आहे. संस्थेच्या इतिहासाला साजेशा पद्धतीने कार्य करून मागील 15 वर्षापासून अतिशय शिस्तीत संस्था चालविणारे डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या नेतृत्वाखालील योगेश्वरी पॅनलच  यंदाही विजय झाला  असून योगेश्वरी शिक्षण संस्थेची सूत्रे पुन्हा त्यांच्याच हाती आली आहेत. श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचा गेली तीन टर्म कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने व संस्थेच्या नावलौकिक   करून सकारात्मक काम करण्याचे सातत्याने प्रयत्न डॉ.सुरेश खुरसाळे यांनी केले. आताही चौथी टर्मही विजयाची प्रतिक ठरली.

श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवून संस्थेच्या केलेल्या प्रगतीबद्दल संस्था सभासदांना व निवडणूकीत मतदान करणार्‍या मतदारांना माझ्या विषय असणारा विश्वास व पँनल मधील उमेदवार यांच्या  विषयी सार्थ अभिमान व विश्वास आहे. त्या विश्वासार्हताचे यश म्हणजे आजचा हा विजय आहे . असे डॉ. सुरेश खुरसाळे यावेळी म्हणाले . विजयी उमेदवार  डॉ . सुरेश खुरसाळे, अॅड . विठ्ठल चौसाळकर, अॅड . शिवाजीराव कराड , अॅड . उदयकुमार कामखेडकर , कमलाकर चौसाळकर , प्रा . नारायण गोळेगावकर , प्रा . श्रीपती जोगदंड, गणपत व्यास , प्रा . माणिक लोमटे , शिशीर बेलुर्गीकर, डॉ . साहेबराव गाठाळ , प्रा . सुरेश देशमुख , रविंद्र जैन , प्रा . भिमाशंकर शेटे , अंजली गोस्वामी , यशोदा राठोड .
निवडणूक अधिकारी म्हणून अॅड . शरद लोमटे व निवृत्त प्राचार्य अशोक पत्की यांनी काम पाहीले.

Post a Comment

0 Comments