परळी वैजनाथ // राज्यातील जनतेला विद्यमान सरकार नको आहे. या सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सर्वच समाजघटकात सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असून सत्ता परिवर्तनात राज्याचे विधान परीषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा सिंहाचा वाटा असेल.या परिवर्तनाच्या लढाईत खंबीरपणे त्यांच्यामागे ताकदीने उभे रहा असे आवाहन ओ.बी.सी.सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते ओ.बी.सी.सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी आज विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ईश्वर बाळबुद्धे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून आगामी काळातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षातील कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, धनंजयज मुंडे हे राष्ट्रवादीची बुलंद तोफ असून आमच्या विदर्भात त्यांच्या सभेला अलोट गर्दी असते. त्यांची लोकप्रियता संपूर्ण राज्यभर असून येणाऱ्या सत्ता परिवर्तनात धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा असेल.जगमित्र कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.अंबेजोगाई ओबीसी तालुकाध्यक्ष धनंजय शिंदे हे उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, दिपक देशमुख,राज्याचे युवक उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे,सचिन औटे,रिखबचंद खेत्रे,अय्यूबभाई पठाण,सुरेशण्णा टाक, विकासराव बिडगर, माणिक फड, शरद मुंडे,अनंत ईंगळे,विजय भोयटे,श्रीकृष्ण कराड, अझिझ कच्छी, अनिल अष्टेकर,गोंविंद कुकर, जयप्रकाश लड्डा,राजेन्द्र सोनी, दत्ताभाऊ सावंत, नाझेर हुसैन,महेंद्र रोडे, गोपाळ कंकाळ,सुरेश गित्ते,लालाखां पठाण, श्रीहरि कवडेकर,गफार काकर,दिनेशगजमल, अमित दुप्ते,शकील कच्छी,अल्ताफ पठाण, शरद कावरे,बलीराम नागरगोजे,तकी खान, रवि मुळे,सचिन जोशी,मोईन काकर,रवि आघाव,सचिन मराठे,शेख मुख्तार,अमर रोडे, श्रीकांत ढेले,कृष्णा मिरगे,रतन आदोडे, सतीष गंजेवार,बालाजी दहिफळे, आकाश डोंगरे, माऊली होळंबे,केशव गायकवाड रावसाहेब घोबाळे, तुकाराम आघाव, यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थीत होते.


0 Comments