Header Ads Widget

Responsive Advertisement

लातुरात एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून खून



दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून खून केल्याची घटना ........

 
लातुर// शहरातील विशाल नगरात राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा मंगळवारी दुपारी दिवसाढवळ्या घरात घुसून शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपूर्वा अनंतराव यादव असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी अपूर्वा ही घरात एकटीच होती. दरम्यान, तिची आई ही देवदर्शनासाठी घराबाहेर गेली होती. तर वडील हे मेडिकल दुकानी होते. दरम्यान, हल्लेखोराने ती घरात एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तीचा मृत्यू झाला. देवदर्शनावरून घरी परतलेल्या आईला अपूर्वा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आईने तातडीने उपचारासाठी  शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

मात्र, तोपार्यंत अपूर्वाचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी अपूर्वाला मृत घोषित केले. अपूर्वा ही कर्नाटक राज्यातील जामखंडी-बागलकोट येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. प्रथम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ती लातुरातील आली होती. दरम्यान, मंगळवारी हल्लेखोरांनी तिचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी भेट देऊन पाहणी केली.

खुनाचे कारण ...
अपूर्वा यादव या तरुणीचा खून कशासाठी झाला, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या कारणांचा लातूरचे पोलीस शोध घेत आहेत. अपूर्वा ही एकुलती एक मुलगी होती. तिचा असा निर्घृण खून करण्यात आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत, या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेण्यासाठी पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments