परळी वैजनाथ // जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथील सभासद कर्जदारास संस्थेचे चेअरमन प्रा.गंगाधर शेळके यांच्या हस्ते आज स्कॉर्पीओ गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. सहकार क्षेत्रात बीड जिल्ह्यातील नामांकीत पतसंस्था म्हणुन सुपरिचित आहे .
परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्था ही नेहमीच गरजु, विश्वासु व मेहनती लोकांच्या घरात आर्थिक क्रांती निर्माण करण्याचे काम करते. या संस्थेच्या आर्थिक सहकार्यांमुळे हजारों लाखों लोकांच्या विश्वासास पात्र असलेल्या या संस्थेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने सभासद कर्जदार खतीब नवाजोद्दीन रहिमोद्दीन यांना स्कॉर्पीओ एस.3 ही फोरव्हिलर गाडी देवुन संस्थेचे चेअरमन प्रा.गंगाधर शेळके यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या गाडीच्या माध्यमातुन आपल्या घराची मोठी आर्थिक प्रगती होणार असल्याच्या आत्मविश्वासाने खतीब नवाजोद्दीन यांचा आनंद या प्रसंगी चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता. या प्रसंगी त्यांनी प्रा.गंगाधर शेळके यांचे आभार मानले. यावेळी पतसंस्थेचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments