Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीकरांसाठी लिहिलेल्या ‘शक्तीपिठे परळीची’ या पुस्तकाचे बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन



परळी वैजनाथ, //
येथील ’सकाळ‘चे बातमीदार लक्ष्मण वाकडे यांनी लिहिलेल्या ‘शक्तीपिठे परळीची’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता.15) सायंकाळी ग्रामदैवत श्री कालरात्रीदेवी मंदिरात माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.वाचनप्रेरणा दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. परळी येथील सुधांशू प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. परळी शहर व पंचक्रोशीतील विविध देवीच्या मंदिराची धार्मिक माहिती, येथील सण, उत्सव, वैशिष्ट्ये आदी विविध स्वरूपाची माहिती या पुस्तकात दिली आहे. ग्रामदैवत कालरात्रीदेवी, डोंगरतुकाईदेवी परिसरातील पुस येथील पद्मावती देवी यांसह पंचक्रोशीतील देवीच्या मंदिरातील माहिती या पुस्तकात आहे. सोमवारी  सायंकाळी शहरातील कालरात्रीदेवी मंदिरात देवीपुढे या पुस्तकाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांच्यासह पत्रकार जी.एस.सौंदळे, प्रशांत जोशी, रविंद्र जोशी, ओमप्रकाश बुरांडे, मोहन व्हावळे, स्वानंद पाटील, धनंजय आढाव, अनंत कुलकर्णी, हनुमंत आगरकर, बालासाहेब राठोड, ॠषीकेश बारगजे, सुधांशू वाकडे यांच्यासह मंदिरातील पुजारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments