शैक्षणिक क्षेञात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व शाळा साविञीबाई फुले पुरस्कारानी सन्मानित....
परळी वैजनाथ // विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. शिक्षण समिती व डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून परळी शहर व परिसरातील शैक्षणिक क्षेञात आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांना क्रांतीबा ज्योतीराव फुले व शाळांना क्रांती ज्योती साविञीबाई फुले पुरस्कारांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यात 14 शिक्षकांना तर 12 शाळांना विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंग मंदिरात काल दि. 25 रोजी पार पडलेल्या या शानदार कार्यक्रमात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे, शिक्षक नेते पी.एस. घाडगे, उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण, रा.कॉ. तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, मा. बांधकाम सभापती शरद मुंडे, रा.कॉ. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद जगतकर, पाणी पुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भावड्या कराड, स्वच्छता व आरोग्य सभापती विजय भोयटे, जेष्ठनेते सुरेश टाक, अनंत इंगळे आदिंच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये कला व साहित्य पुरस्कार प्रा. आरूण पवार, क्रांतीबा ज्योतिराव फुले पुरस्काराने एस.एस. रॉय, सौ. शोभा भंडारी, रमेश कामवार, सय्यद अब्दुल गनी, सुलभा वाघमारे-देशपांडे, सिध्देश्वर इंगोले, सौ. सुषमा खंदारे, मदन इंगळे यांना तर ए.पी. मुंडे, सय्यद अन्वर जाफर, पांडूरंग यादव, अंकुश फड, रतनहारी मुंडे यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेञात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांना क्रांतीज्योती साविञीबाई फुले आदर्श शाळा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यात मराठी माध्यमातील न्यू हायस्कूल, विद्यावर्धिनी विद्यालय, जगमिञ नागा विद्यालय, इंग्रजी माध्यमातील राजस्थानी पादार लर्नस्कुल, फाउंडेशन स्कुल, भेल स्कुल, उर्दू माध्यमातील अंजुमन उल उलूम, मिलीया हायस्कूल, बिला हायस्कूल, प्राथमिथ विभागातून संस्कार प्रा.शाळा, अभिनव प्रा. विद्यालय, जि.प. प्रा.शा. क्र.2 जगतकर गल्ली, ग्रामीण भागातून जि.प. प्रा.शाळा देशमुख टाकळी या शाळांना सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमा दरम्यान जि.प. कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पड रे पाण्या हे गित उत्कृष्ट रित्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ईश्वर बाळबुध्दे, नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे, शिक्षक नेते पी.एस.घाडगे, प्रा. विनोद जगतकर आदिंनी आपल्या भाषणात परळी न.प. च्या शिक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कारांची स्तुती केली व हे पुरस्कार परळी शहरातील शैक्षणिक वातावरण वाढीस प्रेरणा दायी ठरतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात कार्यक्रमांचे संयोजक तथा न.प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे हे पुरस्कार देण्या मागणी भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, क्रांतीराव ज्योतीराव फुले व क्रांती ज्योती साविञीबाई फुले हेच पहिले शिक्षक असून त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होण्याची गरज आहे आणि शिक्षकांचा सन्मान त्यांच्या नावाने पुरस्कार देवून गौरव करणे ही बाब शिक्षकांसाठी प्रेरणा दायी असून आम्ही याच निमित्ताने हे पुरस्कार प्रदान करत असल्याचे सांगितले. यावेळी सदरील पुरस्कार निवड समिती, परळी न.प. चे सदस्य, अधिकारी, कर्मचारी व शहरातील शिक्षण प्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. भालचंद्र वाचनालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन सेवकराम जाधव, मिनाक्षी सुर्यवंशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनंत इंगळे यांनी मानले.
8 कि.मी. पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनीस सायकल भेट
या कार्यक्रमाच्या निमित्तान ेन.प. शिक्षण सभापती गोपाळ आंंधळे यांनी परळी शहरापासून 8 कि.मी. अंतरावर असलेल्या मिरवट येथून परळी शहरात मिळेल ते वाहन व प्रसंगी पायी प्रवास करणाऱ्या होतकरू विद्यार्थीनीस सायकल भेट दिली. मिरवट येथील दिपाली महारूद्र कसबे या विद्यार्थीनीस या कार्यक्रमात सायकल भेट देवून आदर्श उपक्रम राबविला.


0 Comments