Header Ads Widget

Responsive Advertisement

गरीब रूग्णांसाठी मोफत व सर्वसामान्य रूग्णांसाठी अल्पदरात डायलेसिस सेंटर सुरू; श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने परळीत आज उद्घाटन-राजेश देशमुख


परळी वैजनाथ,// गरीब रूग्णांसाठी मोफत व इतर सर्वसामान्य रूग्णांसाठी अल्पदरात डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन शुक्रवारी (ता.26) राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती  येथील वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.
शहरातील जयनगर भागातील वैद्यनाथ क्रिटीकल केअर सेंटर येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किडनी विकार रूग्णांसाठी अतिशय उपयुक्त असलेली ही सुविधा सर्वप्रथम तालुक्यात उपलब्ध होत आहे. गरीब रूग्णांसाठी ही सुविधा मोफत असून इतर सर्वसामान्य रूग्णांसाठी माफक दरात ना नफा ना तोटा या धर्तीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी  सायंकाळी चार वाजता राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुखयांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास लातूरच्या सहधर्मदाय आयुक्त एन.एस.पवार, बीडचे उपायुक्त एम.एल.जोगी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त एस.व्ही.एच.कादरी, एस.जे.बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन काळे, डॉ.सुर्यकांत मुंढे, डॉ.सतीश गुट्टे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान संस्थेचे अध्यक्ष तहसीलदार शरद झाडके,  सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदीप देशमुख, अनील तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, यशवंत पुजारी व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments