Header Ads Widget

Responsive Advertisement

झायलो गाडीच्या अपघात; एका जणाचा जागीच मृत्यू .




परळी // परळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर आज रात्री साडेनऊच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका जनाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर उड्डाणपुलावर वाहनांची गर्दीच गर्दी झाली होती.
आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. महिंद्रा कंपनीची झायलो गाडी क्र. एम.एच.15 डिजे 5551 असा गाडीचा क्रमांक आहे. या गाडीने एकावर एक पाच पलट्या घेतल्याने त्यात असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघात झाल्यानंतर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळावर झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गर्दीला पंगवल्यानंतर मृताला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृत झालेल्या मुलाचे नाव अजय दशरथ गित्ते  रा. सोमेश्वर नगर परळी वै आहे.


Post a Comment

0 Comments