Header Ads Widget

Responsive Advertisement

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही - प्रा.दिलिप भिसे

 
                               
  अंबाजोगई // श्री योगेश्वरी नूतन विद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्त आयोजित वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय  मराठी विभाग प्रमुख   डाँ दिलीप भिसे हे होते  त्यावेळी  आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले  पुस्तक वाचनातून  सकारात्मक विचारांना आचरांची  सांगड घातली जाते स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही  . आपल्या आंबेजोगाई संस्कृतीत संताची खूप मोठी पंरपरा आहे.या संताच्या पंरपरेवर आपला भारत देश घडत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ के.टी व्यास मॅडम या होत्या यांनी ही विद्यार्थीना पुस्तकांचे महत्त्व सांगितले .

यावेळी  व्यासपीठावर   उपमुख्याध्यापिका सौ.अलका साळूंके ,पर्यवेक्षक शिवकुमार निर्मळे ,सौअपर्णा पाठक ,विलास गायकवाड ,  भागवत मसने ,ग्रंथपाल दिलीप पसारकर ,सुधीर कन्नडकर हे उपस्थितीत होते .

सुरूवातीला   सर्व मान्यवरांनी डॉ ए पी जे अबुल कलाम   यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले      सांस्कृतिक विभाग प्रमुख  बी  आर  मसने यांनी  डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर  माहिती देऊन यांनी प्रस्ताविक केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  हेमंत भालेराव यांनी केले  तसेच ग्रंथपाल  दिलीप पसारकर यांनी सर्वाचे  आभार मानले.


Post a Comment

0 Comments