Header Ads Widget

Responsive Advertisement

75 वाढदिवस अमृत महोत्सव साजरा



परळी// मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतिने संस्थेचे अध्यक्ष अँड.अनंतराव जगतकर यांचा 75 वाढदिवस अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

मिलिंद विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड हे उपस्थित होते. यावेळी आ.विक्रम काळे यांच्या हस्ते ऍड.जगतकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून औरंगाबाद येथील महसुल विभागाचे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व उपजिल्हाधिकारी किरवले, महाराष्ट्र औद्योगिक न्यायालयाचे सेवानिवृत्त अध्यक्ष न्यायमुर्ती विद्यासागर कांबळे, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य कमलाकर कांबळे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.एस.के.जोगदंड, सोनपेठ येथील प्रा.डॉ.सा.द.सोनसळे, माजी विद्यार्थी न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, डॉ.काळे, डी.के.कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य के.एन.पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपिठावरील मान्यवरांनी आपल्या भाषणातून मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक, संास्कृतिक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक करत असलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून ऍड.जगतकर यांचे अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन केले व याच प्रांगणात ऍड.जगतकर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचे अभिवचन दिले.याप्रसंगी शाळेतील अनेक माजी विद्यार्थी जे शासनाच्या विविध भागात यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यंाना पाचारण करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.यल्लावाड तर आभार पर्यवेक्षक रमेश कोमावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments