Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रीमद जगतगुरु शंकरचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन





परळी वैद्यनाथ // करवीर पीठाचे शंकराचार्य श्रीमद जगतगुरु विद्या नृसिंह भारती स्वामी यांनी गुरुवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.राव राजूर येथील चातुर्मास सांगता केल्यानंतर जगतगुरु शंकरचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांनी गुरुवार दि.27 रोजी दुपारी 12 वा. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन प्रभुस रुद्राभिषेक केला.कुमार जोशी,प्रदीप अग्निहोत्री,शिरीष राजूरकर,विवेक पाठक,प्रमोद जोशी यांनी अभिषेकाचे पौरोहित्य केले.

या रुद्राभिषेकानंतर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख,ट्रस्ट चे सदस्य विजयकुमार मेनकुदळे,मुकुंद देशपांडे यांनी ट्रस्टच्या वतीने स्वामीजींचे प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत केले.यावेळी बाळू पुजारी,दिलीप जोशी,अँड.दत्तात्रय आंधळे,अँड.राजेश्वर देशमुख,प्रशांत रामदासी,मनोज रामदासी,स्वानंद पाटील,दिनेश लोंढे आदिंसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ, करवीर तर्फे सुरू करण्यात आलेल्या ज्ञान या त्रैमासिकाचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments