कोपरगाव// नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील भर वस्तीमध्यील सूर्या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हात साफ केले आहेत. चोरट्यांनी प्रफुल्ल शांतीलाल बोरा यांच्या घरातील जवळपास 70 तोळे सोने व चांदी दागिने तसेच काही रोख रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. बोरा कुटुंबीय गुजरात येथे देवदर्शनासाठी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणी पोलीस पंचनाम्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून उशिरा रात्री पर्यंत फिर्याद दाखल कराण्याचे काम सुरू होते.


0 Comments