Header Ads Widget

Responsive Advertisement

शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षण अधिकारी कार्यालयातच शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड // येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने  शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विलास वामन गुरव (४५) असे या शिक्षकाचे नाव असून ते सुभद्रा बाई माध्यमिक विद्यालय , तगाडगाव , तालुका शिरूर जिल्हा बीड या शाळेत अध्यापनाचे काम करतात. त्यांनी या शिक्षण संस्थेतील सचिवांवर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिक्षण अधिकारी बीड येथे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुरव यांनी केला. सुदैवाने त्यांना काेणतीही हानी झाली नाही

Post a Comment

0 Comments