Header Ads Widget

Responsive Advertisement

विजेचा शॉक लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

डिपी चे मुख्य कामे नवीन हेल्पर ला  देऊन भोकर विद्युतभवन कार्यालय बिनपगारी हेल्परच्या जीवाशी खेळत आहे  का?
   
भोकर//
भोकर तालुक्यातील किनी येथील शेतातील लाईट बंद असल्याने ते चालु करण्यासाठी डिपीवर चढुन विज चालु करण्यासाठी गेला असता विजेचा शॉक लागून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मौजे किनी ता भोकर येथे सायंकाळी घडली.भोकर विद्युत ऑफिस चा हा भोंगळ कारभार  पुढे अजून किती दिवस चालणार आहे

  किनी गावालगत शेतातील लाइट बंद असल्याने चालू करण्यासाठी तो खांबावर चढला त्यावेळी त्यांना विजेचा शॉक लागल्याने ते त्या डिपीला चिटकुन त्यांचा जागीच मुत्यु झाला. मौजे किनी येथील एका  शेतातील डिपी वर खाजगी विद्युत मंडळाचे काम करणारा मौजे आमठाणा येथील तरूण मनोज किशन जाधव वय ३५ वर्षे या तरुणास शाक लागुन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

भोकर तालुक्यात सर्वच लाईनं मन हेल्पर ला अशी अवघड कामे करतांना त्या भागातील लाईट बंदचे परमिट न घेता त्यांच्या  जीवाची पर्वा न करता त्यांना असे अवघड कामे करून घेणारे या घटनेस जबाबदार असूनही त्यांच्यावर  कारवाई का केल्या जात नाही  हे सगळी कामे कुठल्याच नियमावलीला धरून होतात  असा सवाल ह्या वेळी कार्यालया बाहेर व घटनास्थळी होती यात दोषींनवर कारवाई होणार का  ह्या कडे सर्व किनी व आमदारी येथील नागरिकांचे लक्ष वेधून आहे

Post a Comment

0 Comments