Header Ads Widget

Responsive Advertisement

सरफा हत्या प्रकरणी सिरसाळ्यातील सरफांचा बंद


 सिरसाळा //- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफावर गोळीबार करत लूटमार केल्याच्या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ सिरसाळा येथील सराफा असोसिएशनने दुकाना बंद ठेवल्या होत्या. यामध्ये  सराफा व्यापार्‍यांचा सहभाग होता.
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफा बांधवावर गोळीबार करण्यात आला. त्यांना ठार मारुन दुकान लुटण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून  या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली असून दरोडेखोरांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे व सदरील घटनेच्या निषेधार्थ मराठवाड्यातील सराफा व्यापार्‍यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवले होते. या बंदला सिरसाळ्यात  चांगला प्रतिसाद मिळाला असून सिरसाळा व परिसरातील व्यापार्‍यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments