Header Ads Widget

Responsive Advertisement

बॉम्बस्फोटप्रकरणी अटक आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा

मुंबई - नालासोपारा येथील बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह इतर आरोपी हे सनातन संस्थेचे साधक नसल्याचा दावा
सनातन संस्थेने केला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा करून अटक आरोपींबाबत आपले हात झटकले आहेत. तसेच मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होतू होता, असा करण्यात येत असलेला आरोपही सनातनने फेटाळला आहे.

नालासोपारा येथे आढळलेली स्फोटके, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये हात असलेल्या आरोपींना अटक करण्यात आलेल्या अटकेनंतर या आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही. ते सनातनचे साधक नव्हते, असा दावा यावेळी सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला. "तपासात सनातनचे थेटपणे नाव आलेले नाही. मराठा आंदोलन तसेच ईददरम्यान स्फोट घडवण्याचा सनातनचा हेतू होता, असा करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे. असे राजहंस यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments