Header Ads Widget

Responsive Advertisement

अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या बीड युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश जाधव यांची निवड


परळी | प्रतिनिधी
अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या बीड युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश जाधव यांची निवड करण्यात आली असून परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव दळे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे.
      बलुतेदार आलुतेदार समाजाच्या विविध प्रश्नांवर परिषद काम करत असून निलेश जाधव यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हे पद देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निलेश जाधव हे गवळी समाज तसेच ओबीसी व भटक्या जमातीतील विविध उपक्रमांत सक्रिय सहभागी असतात यापुढे आपण संघटना वाढवण्यासाठी व बलुतेदार आलुतेदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करावे असे दळे यांनी नियुक्तीपत्रात म्हंटले आहे.
निलेश जाधव हे परळी वैजनाथ येथील असून त्यांचा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे.दरम्यान, बीड जिल्ह्यात लवकरच युवकांचा मेळावा घेऊन त्यात परिषदेची पुढील वाटचाल ठरवण्याची व जिल्ह्यात सर्वत्र परिषदेच्या शाखा उघडण्यात येऊन युवकांना संघटीत करण्यात येईल अशी माहिती नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिली.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments