Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांचे निधन

मुंबई // काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.ते 63 वर्षांचे होते.गुरुदास कामत हे आपल्या काही कामानिमित्त दिल्लीमध्ये गेले होते.बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना दिल्लीमधील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यत त्यांचे निधन झाले होते.

गुरूदास कामत हे १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेले होते.काँग्रेस प्रणित यूपीएच्या कार्यकाळात २००९ ते २०११ या कालावधीत ते केंद्रीय राज्यमंत्री होते.मात्र,२०१४ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.गुरुदास कामत यांनी काँग्रेसचे सरचिटणीस पदावरती देखील काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.

Post a Comment

0 Comments