कडा (प्रतिनिधी)लोकप्रिय आ.भीमराव धोंडे व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे प्रयत्नाने कडा आणि बस स्थानक आपले रुप पालटणार आहे या दोन्ही ही बस स्थानकांच्या निविदा(टेंडर) निघाल्या असुन लवकरच प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होईल आ.भीमराव धोंडे यांनी सन 2017 च्या अर्थसंकल्प अधिवेशन कडा आणि आष्टी बसस्थानकाच्या नुतनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता व परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे कडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता ना.रावते यांनी विधानसभेत या बाबत लवकरच कार्यवाही करुन कामे मंजुर करण्याचे उत्तर दिले होते त्या प्रमाणे सदर ची दोन्ही कामे मंजुर झाली असुन या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत कडा येथील बस स्थानक 1 कोटी 50 लक्ष व आष्टी 2 कोटी 74 लक्ष रु.ची टेंडर असुन दि 28 ऑगस्ट निविदा स्विकारण्याची शेवट तारीख आहे या निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन ठेकेदार निश्चित झाल्यावर या दोन्ही बस स्थानकांचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पंकजाताई मुंडे व परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांचे उपस्थित होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले कडा आष्टी हे दोन्ही बस स्थानके आता कात टाकणार असुन सर्व सुख सुविधा या नवीन बसस्थानकावर असणार आहेत मराठवाड्याच्या प्रवेश द्वारावरील हे बस स्थानके लोकांची मने व लक्ष वेधून घेतील
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments