ना. पंकजाताई मुंडे वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेचा उपक्रम !_
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी.....
राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविला असून याअंतर्गत शहरातील अनाथ झालेल्या तीन मुलांचा परिवार दत्तक घेण्यात आला आहे. या माध्यमातून या अनाथ झालेल्या लेकरांना आधार मिळाला आहे.
शहरातील पंचशील नगर भागात राहणाऱ्या रणदिवे परिवारातील तीन मुले आपल्या आई-वडिलांचे छत्र हरवून बसले आहेत.त्यांना असलेल्या आधाराची गरज लक्षात घेत या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्यासाठी परळीतील भाजयुमोचे पदाधिकारी पुढे आले. राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा काल 26 जुलै रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने या पदाधिकाऱ्यांनी या अनाथ चार मुलांचा परिवार दत्तक घेतला. ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते या मुलांना कपडे देण्यात आले आहेत. या परिवाराची संपूर्ण जबाबदारी या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. यावेळी या परिवाराला दत्तक घेणारे भाजयुमोचे अॅड. अरुण पाठक, योगेश पांडकर, कुलभूषण जैन, विजय दहिवाळ, प्रवीण राका, रवी वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments