विद्यावर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली आषाढी वारी
*पायी दिंडी; पालखी
परळी/(प्रतिनिधी)
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विद्यवर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज शनिवार दि.21 जुलै रोजी पायी दिंडी व पालखी सोहळा आयोजित करीत आषाढी वारीचा अनुभव घेतला. टाळ मृदंगाचा गजर, मुखी विठ्ठल नाम आणि चिपळयांचा निनाद करीत निघालेल्या या वारीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या वारीत विठ्ठल रूक्मीणीसोबतच विविध संत महापुरूषांच्या वेशभूषाही विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. एकुणच वातावरण भक्तीमय झाले होते.
परळी येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आषाढी वारी सोहळा व पालखी सोहळा आयोजित केला होता. या सोहळयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विठ्ठल रूक्मीणीचा आकर्षक पेहराव घेतलेल्या बाल विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत मिराबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा वेगवेगळया संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करीत बाल वारकऱ्यांची पाऊले रस्त्यावरून पुढे सरकत होती.
यावेळी दिंडीची सुरूवात नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून करण्यात आली. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, युवक नेते सचिन जोशी, औष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता तथा संस्थेचे अध्यक्ष खटारे, अधिक्षक अभियंता गिरी, राऊत, कल्याण अधिकारी वासुदेव, विजय आघाव, शाळेचे सचिव पी.जी.ईटके, भिंगोरे, पैंजणे, एम.पी.मुंडे, मुख्याध्यापक उन्मेष मातेकर, नांदुरकर आदींनीही पालखीचे पुजन केले. दिंडीत पाऊले, फुगडी असेही कार्यक्रम पार पडले. दिंडीतील विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.




0 Comments