Header Ads Widget

Responsive Advertisement

चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी


परळी ( प्रतिनिधी )  मराठा क्रांती ठोक मोर्चा परळीत सुरू आहे, आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. काळ दि.22 रोजी मोर्चास्थळी झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. शासनाने या आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करत असतांना परळीलाच शिस्टमंडळ पाठवून चर्चा करावी असे आवाहन मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज दि.23 रोजी सकाळपासून राज्यभरात ठिकठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येत असून, काही ठिकाणी हिंसक वळणंही लागलं आहे. आमचं आंदोलन परळीत असून राज्यात इतर ठिकाणी काहीजरी झाले तरी त्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याने त्यांच्या कालच्या वक्तव्याचा हा परिणाम असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, मराठा समाजाविषयी साप सोडण्याचे चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे. पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले होते की आषाढी वारीत साप सोडून खळबळ माजवण्याचा कट होता. परंतु हा कोणाचा कट होता हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. संबंधित विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे वक्तव्य परळीत होत असलेल्या आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments