Header Ads Widget

Responsive Advertisement

यूट्यूबच्या माध्यमातून आपण सहजपणे करियर करू शकता.


महेश कोळी
सोशल  मिडियाच्या माध्यमातून  स्वतः घडवा स्वतःचे  करिअर...

आजच्या घडीला स्पर्धा खूपच वाढली आहे. त्यामुळे आजच्या काळात करियर आणि आयुष्याच्या घोडदौडीत पुढे जाण्यासाठी उमेदवार काहीही करण्यास तयार होतात. आजमितीला पैसे कमावण्यासाठी आपण अभ्यासापेक्षा आपण कोणत्या क्षेत्रात कुशल आहात, हे पाहिले जात आहे. या कारणामुळेच सोशल मीडियाचा प्रयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जर आपल्या अंगी संवाद कौशल्य आहे आणि कोणत्याही वस्तूविषयीचे मत अचूकरित्या मांडू शकत असाल तर आपण यूट्यूबवर हिट होऊ शकता. म्हणूनच यूट्यूबच्या माध्यमातून आपण सहजपणे करियर करू शकता. यूट्यूबवर करियर करण्यासाठी एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे यूट्यूब अकाऊंट सुरू करा आणि बक्कळ पैसा कमवा.


यूट्यूबवर चॅनेल सुरू करण्याअगोदर आपण कोणत्या क्षेत्रात व्हिडिओ तयार करु इच्छित आहात, हे निश्‍चित करावे लागेल. कोणत्या विषयावर आपले प्रभुत्व आहे, हे जाणून घ्या. त्यानुसार संशोधन करा. सोशल मीडियाचा ट्रेंड आणि आपला विषय यात ताळमेळ बसायला हवा. कालबाह्य विषयाची मांडणी केल्यास आपल्याकडे कोणीही फिरकणार नाही. आपण एखाद्या विषयावर चांगले बोलू शकत असाल, लोकांशी सहजपणे जोडले जात असाल तर यूट्यूबवर फॉलोअरची संख्या वाढण्यास अडचण येणार नाही. स्टॅंडअप कॉमेडी, विविधप्रकारचे नावीन्यपूर्ण खेळ, दुरुस्तीकाम, फॅशनचा ट्रेंड, पर्यटनाचे अनुभव, टिप्स, खाद्यपदार्थांची माहिती, बाजारातील नव्या फॅशनची माहिती, संगीत, कलासंबंधीचे ऑनलाइन प्रशिक्षण, ऑनलाइन ट्यूशन आदीं क्षेत्रात आपण स्वत:चे चॅनेल सुरू करू शकतो. सुरवातीच्या काळात आपल्याला भरपूर सबस्क्रायबर मिळणार नाहीत. यूजरच्या टिकेलाही काहीवेळा सामोरे जावे लागेल. परंतु आपल्याला संयम बाळगावा लागेल. अधिकाधिक यूजर आपल्या चॅनेलकडे यावेत यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये अचूकता, आकर्षता आणि उपयुक्ततता आणावी लागेल.

जर आपण यूट्यूबवर चेॅनल सुरू करण्याचे निश्‍चित केले असेल आणि आपल्याला परवानगी मिळाली असेल तर नियमितपणे फॉलो करणाऱ्या गटाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करा. यूट्यूबशिवाय ट्विटर, इस्टाग्रामचे ज्ञान देखील मिळवा आणि अधिकाधिक फॉलोअर जोडा. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मिळणाऱ्या फिडबॅकच्या आधारावर यूट्यूबवरील करियरची दिशा निश्‍चित करू शकतो. यूजरला नवीन गोष्टी सांगण्यापासून परावृत्त होऊ नका. आपला श्रोता केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील असू शकतो. श्रोत्यांनी आपली वाट पाहयला हवी, अशा प्रकारचा कंटेट देण्याचे नियोजन करायला हवे.

चॅनेल किंवा व्हीडिओचे नाव हे विषयाशी निगडीत आणि यूनिक असणे अपेक्षित आहे. जेणेकरून चॅनेलचे नाव लोकांच्या सहज लक्षात राहिल आणि आपल्या उत्पन्नाचे साधनही वाढेल. यूट्यूबवर आपण जो व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तो ओरिजनल असावा, असा यूट्यूबचा नियम आहे. जर आपण दुसऱ्याचा व्हीडिओ अपलोड केला तर यूट्यूब आपल्याला पैसे देणार नाही. चॅनेलचे नाव विषयाच्या विरुद्ध नसावे, याची काळजी आपण घ्यावी. आपल्या चॅनेलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण माहितीचा खजिना असावा. अन्य मंडळीपेक्षा आपला कंटेट हा हटके असावा, जो की लोकांना आवडेल आणि त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. आजमितीला यूट्यूबवर हजारो चॅनेल आहेत. मात्र सर्वच कमाई करत नाहीत. कारण त्यांच्याकडे कंटेट चांगला नाही. आपण ही चूक करू नये. आपल्या चॅनेलवर यूजफूल कंटेट दाखवण्याचा प्रयत्न करा

Post a Comment

0 Comments