आरक्षणावर राज ठाकरे म्हणाले ....पुणे.... पुण्यात महाराष्ट्र निर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातल्या भाषणावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आताचे सगळे मुख्यमंत्री हे बसवलेले आहेत अशा शब्दात त्यांनी मराठा आरक्षणावर तुफान टोलेबाजी केली आहे. सध्या मराठा आरक्षणाने अवघा महाराष्ट्र राज्य पेटून उठला आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. आरक्षणाबाबत सरकार तुमच्या भावनांशी खेळत आहे, स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळाल्या तर आरक्षणाची गरज नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही इतर राज्यापेक्षा आतापर्यंत महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे आधी मराठी मुलांना नोकऱ्या मिळू द्या. आम्हाला जातनिहाय आरक्षण नको आहे. आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. स्थानिकांना जर इथे विविध संस्थांमध्ये 80 टक्के नोकऱ्या मिळत असतील तर आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी समाजात जातीचे विष कालवलं आहे. सरकार खाजगी संस्थांना प्रोत्साहन देतंय आणि सरकारी संस्था बंद पाडतंय. मग आरक्षण देणार कोण आणि त्याचा उपयोग तरी काय असा सवालही राज यांनी विचारला आहे. सरकारी नोकऱ्या जर कमी होत चालल्या आहेत तर मग खासगी नोकऱ्या जातायत कुठं असंही राज म्हणाले आहेत. या आरक्षणाच्या नादाच काकासाहेब शिंदे यांचा हाकनाक बळी गेला, हे सरकार फक्त तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व पक्ष फक्त मतांसाठी तुम्हाला खेळवत आहेत, अशा शब्दात राज यांनी भाजपवर तोफ डागली आहे.


0 Comments