Header Ads Widget

Responsive Advertisement

भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*.... *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*.... *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* *पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*... *👣||राम कृष्ण हरी||👣* 🚩🙏 *आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏🚩

*संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा...*           
*बोलावे बरे | बोलावे खरे |*
*कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||*

*थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |*
*शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |*
*शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||*
*जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |*
*पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये*     
लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

पंढरपूर – देवशयनी आषाढी एकादशीसाठी विठुनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात अलंकापुरी दुमदुमली असून, रविवारी संध्याकाळी तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरीत दाखल झाली.

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची मानाची विठ्ठलाची महापूजा यावर्षी मानाचे वारकरी करणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.  महापूजेवेळी सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच अन्य मंत्री उपस्थित राहतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते.

मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते. काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचे काम केले जात आहे. माज्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. महाराष्ट्रात वारीची परंपरा ८०० वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिलं. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे.

Post a Comment

0 Comments