Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीत आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाकवी संमेलन !

**
_मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी_
परळी वैजनाथ /प्रतिनिधी....
        माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ गटनेते आ.अजितदादा पवार व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध सामाजिक आणी लोकोपयोगी उपक्रमांच्या  'आधार महोत्सवाचे' आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.आज 22 जुलै रोजी  
आ.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवींचे महाकवीसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. रसिकश्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
       परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै  दरम्यान आयोजित आधार महोत्सवाचाआज समारोप होणार आहे. सायंकाळी 6 वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आ.अजितदादा पवार  यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून महाकवीसंमेलन होणार आहे.या महाकवीसंमेलनात प्रेमकवीतेने तरुणाईला मोहविणारे "प्रिये...जांगडगुत्ता..!" फेम नारायण पुरी,बे-लगाम राजकीय शक्तिला आपल्या वाणीमधून अंकुश घालणारे "विकला असेल चहा म्हणून देश विकायचा असतो का?" फेम अंकुश आरेकर.जी.एस.टी. नोटबंदी या सारख्या विषयांवर भन्नाट विडंबन करून रसिकांना हास्यरसात चिंब भिजवीणारे "झिंगाट" फेम.मातिशी नाती कायम ठेवून मातीची गाणी गाणारे ग्रामीण कवी संदीप जगताप,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार नितिन देशमुख,नामवंत सूत्रसंचालक भारत दौण्डकर,सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे ज्यांची "मग खेडयाकडे चला..याचा अर्थ काय बापु..." कविता विधिमंडळात गायल्या गेली असे अरुण पवार,स्त्री शक्तीचा गौरव कथित करणाऱ्या कौटुंबिक जिव्हाळ्यावर कविता सादर करणाऱ्या सुहासिनी देशमुख आदि नामवंत कवी उपस्थीत राहणार आहेत.
   शहरातील या सांस्कृतिक पर्वणीचा रसिकश्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments