Header Ads Widget

Responsive Advertisement

बहिणीच्या लग्नात गायलेल्या त्या एका गाण्याने बदलले मुकेश यांचे नशीब!

आपला पेपर स्पेशल ....संघर्षातून यशाकडे.......
बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश अर्थात मुकेश चंद्र माथुर यांचा कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा आवाज म्हणून ते ओळखले जात. १९२३ साली आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी दिल्लीत मुकेश यांचा जन्म झाला होता.

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक मुकेश अर्थात मुकेश चंद्र माथुर यांचा कोण विसरू शकेल. बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा आवाज म्हणून ते ओळखले जात. मुकेश यांनी गायलेली अनेक अजरामर गाणी आजही संगीतप्रेमी विसरू शकले नाहीत. नैना है जादू भरे...,मुझको इस रात की तनहाई में...,दीवानों से ये मत पूछो... , कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे... जाने कहा गए वो दिन... अशी त्यांनी गायलेली एकापेक्षा एक लोकप्रीय गाणी ‘दर्दी’ चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहेत. १९२३ साली आजच्याच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी दिल्लीत मुकेश यांचा जन्म झाला होता.




मुकेश यांचे वडील जोरावर चंद्र माथुर इंजिनिअर होते आणि आई राणी गृहीणी होत्या. मुकेश यांना संगीतप्रेमाने इतके झपाटले होते की, शिक्षणात त्यांचे मन कधीच रमले नाही. दहावीतचं त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि एका शासकीय विभागात काम करू लागले. यादरम्यान त्यांनी व्हाइस रेकॉर्डिंग सुरु केले आणि हळू-हळू गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. याचदरम्यात न अशी काही घटना घडली की, त्या प्रसंगाने त्यांच्या अख्ख्या आयुष्याला कलाटणी दिली. होय, बहिणीच्या लग्नात मुकेश यांनी गाणे गायले आणि त्या एका गाण्याने मुकेश यांचे आयुष्य बदलले. त्या लग्नात प्रसिध्द अभिनेता मोतीलाल हजर होते. त्यांनी मुकेश यांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर मोतीलाल यांनीचं मुकेश यांना मुंबईला आणल़े. मुंबईत मोतीलाल यांनी मुकेशला पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे सोपवले. मुकेश जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे धडे गिरवू लागलेत आणि इथेच गायक मुकेश या गायकाचा जन्म झाला.

Post a Comment

0 Comments