Header Ads Widget

Responsive Advertisement

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे संपुर्ण जीवन संघर्षमय होते.

समाजातील वाईट चाली-रितीवर आपल्या विनोदी शैलित त्यांनी समाजातील अयोग्य गोष्टींवर बोट ठेवुन त्या सुधारण्यासाठी आपणापासून सुरुवात  केली पाहिजे .....ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)


                 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे संपुर्ण जीवन संघर्षमय होते. त्यांनी आपले अख्खे आयुष्य दिन-दलित, दुबळ्या, दुर्लक्षीत व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समर्पीत केले. लाखों लोक मेल्यानंतर लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा समाजासाठी झटणारा नेता जन्माला येतो अशा शब्दात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकर ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचे कौतुक केले.

    राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नगरसेवक प्रा.पवन मुंडे व कन्हेरवाडीचे सरपंच तथा परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेभाऊ फड यांच्या वतीने येथील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार, दि.29 जुलै रोजी रात्री 7 ते 9 या वेळेत ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे अत्यंत जोशपुर्ण कीर्तन झाले. इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. गर्दीचा अक्षदा मंगल कार्यालयात नवा उच्चांक प्रास्तापित झाल्यामुळे शिवाजी चौक ते नाथ रोड रस्ता अक्षरशः बंद करावा लागला. इंदोरीकर महाराज यांनी आपल्या जबरदस्त विनोदी शैलीत परळी व पंचक्रोशितील भाविकांना मंत्रमुग्द केले.  समाजातील वाईट चाली-रितीवर आपल्या विनोदी शैलित त्यांनी समाजातील अयोग्य गोष्टींवर बोट ठेवुन त्या सुधारण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सांगितले. आजचा तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत असुन यावरही त्यांनी कडाडुन हल्ला चढविला व समाजाच्या व देशाच्या विकासासाठी तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. त्याच बरोबर ज्या आई-वडीलांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हडाची काडे केली. ते वृद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर मुलांनी लक्ष ठेवण्याचे कर्तव्यच असल्याचे सांगुण. जे मुले आई-वडीलांकडे दुर्लक्ष करीतात अशांची त्यांनी आपल्या भाषेत चांगलीच खरटपट्टी केली. लग्न कार्यात  होत असलेल्या अवांतर खर्चावरही त्यांनी यावेळी मौलीक सल्ला दिला. कर्जबाजारी होवुन लग्न मोठ्या थाटामाटात करण्यापेक्षा अनावश्यक खर्चास फाटा देवुन अंथरुन पाहुन पाय पसरावेत जेणे करुन जीवनात नंतर समस्या उद्भवणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ना.पंकजाताई मुंडे यांच्या कामांचे कौतकही यावेळी इंदोरीकर महाराजांनी केले. इंदोरीकर महाराजांनी आपल्या खास विनोदी शैलीमध्ये कीर्तन केल्यामुळे दोन तास केंव्हा संपुन गेले हे उपस्थितांना समजलेही नाही. यावेळी  हसुन-हसुन  उपस्थित नागरीक कीर्तन ऐकण्यासाठी तल्लीन झाले होते.

********

कीर्तनामुळे मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन होवुन हजारों लोकांची मने विनोदी कीर्तनामुळे प्रफुल्लीत व प्रसन्न होत असल्यामुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे यापुढे दरवर्षी कीर्तन ठेवणार असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक प्रा.पवन मुंडे व कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले

कीर्तनामुळे मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन होवुन हजारों लोकांची मने विनोदी कीर्तनामुळे प्रफुल्लीत व प्रसन्न होत असल्यामुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे यापुढे दरवर्षी कीर्तन ठेवणार असल्याचे या कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक प्रा.पवन मुंडे व कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले.g

Post a Comment

0 Comments