परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष , श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेचे संस्थापक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे संस्थापक पैलवान मुरलीधर मुंडे यांना एकता सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य, परभणीच्या वतीने राज्यस्तरीय क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "एकता गौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मुंडे परिवाराच्या वतीने कन्हेरवाडीत हृदयसत्कार करण्यात आला.
मौजे कन्हेरवाडी येथे दि.29 रोजी सूर्यकांत अंतराम मुंडे यांच्या निवासस्थानी तळेगाव येथील व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर भागवतराव मुंडे यांना नुकताच एकता सेवाभावी संस्थेचा दिला जाणारा राज्यस्तरीय क्रिडा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने सूर्यकांत मुंडे यांच्या हस्ते पैलवान मुरलीधर मुंडे यांचा सपात्निक सत्कार फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.सुर्यकांत मुंडे म्हणाले की , पैलवान मुरलीधर मुंडे यांचे क्रीडा क्षेत्रातील काम पाहून इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हटले.
याप्रसंगी राष्ट्रीय पैलवान कु.प्रतिक्षा सूर्यकांत मुंडे (कन्हेरवाडीकर), देविदासराव फड.अंतराम मुंडे (बापू). प्रा.सुनिल फड, सूर्यकांत मुंडे, ग्रामपंचायत सदस्य विकास दादा मुंडे, समाधान मुंडे, राजकुमार फड.श, रधुनाथ फड, प्रविण फड, बालाजी कराड व गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.
0 Comments