बीड :.....भारतीय डाक विभागाच्यावतीने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा/ ढाई आखर आयोजित केली आहे. पत्राचा विषय मेरे देश के नाम खत हा असून पत्र हिंदी, इंग्रजी व मराठी यापैकी कोणत्याही भाषेत लिहिता येईल. पत्र मुख्य पोष्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई जी.पी.ओ. मुंबई यांचे नावे लिहून आपल्या जवळच्या टपाल कार्यालयांमध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत दाखल करावे. या पत्रावर वरच्या बाजूस ढाई आखर लिहिणे आवश्यक आहे. मुदतीनंतर पाठविलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश होणार नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
पत्र लेखन स्पर्धा 18 वर्षांपर्यंत एक गट व 18 वर्षावरील दुसरा गट अशी विभागलेली आहे. स्पर्धकांनी 1 जानेवारी 2018 रोजी स्वतःचे वय 18 पेक्षा कमी किंवा जास्त आहे, याबाबत उल्लेख करावा. तसेच नाव पत्यासोबत वयाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. पाकिटातून पत्र पाठवण्यासाठी 1 हजार शब्द मर्यादा तर अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्द मर्यादा राहील.
राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 10 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये पारितोषिक राहील. राज्यस्तरावरून प्रत्येक गटातून निवडलेले तीन उत्कृष्ट पत्र राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येतील. राष्ट्रीयस्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे प्रथम 50 हजार रुपये द्वितीय 25 हजार रुपये व तृतीय 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल.याबाबतच्या अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपक साधावा, पत्र लेखन स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन एस.एन. शास्त्री अधीक्षक डाक घर ,बीड विभाग बीड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.





0 Comments