Header Ads Widget

Responsive Advertisement

2 ऑगस्ट रोजी परळीत गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन


परळी (प्रतिनिधी)
दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने गुरूवार दि.2 ऑगस्ट  रोजी गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी संस्थानच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

येथील हालगे गार्डन, परळी वै. मध्ये असलेल्या प्रशस्त भव्य प्रांगणात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार हा उत्सव साजरा केला जाणार असून सकाळी 9 वा. गुरू पुजन व त्यानंतर धार्मीक कार्यक्रमांना प्रारंभ केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सत्संग, किर्तन, प्रवचन व भजनाचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मीक सोहळयाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments