परळी/प्रतिनिधी प.पू.गुरूवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 18 व्या पुण्यस्मरणार्थ होणारा वार्षिक सप्ताह दै.मराठवाडा साथी, बियाणी परिवार, राधा मोहन प्रतिष्ठाण व अ.भा.वारकरी मंडळाच्या वतिने गुरूवार दि.21 जुनपासून थर्मल कॉलनीमधील श्री हनुमान मंदिरात प्रारंभ हेात आहे. या सप्ताहात भागवताचार्य ह.भ.प.भरत महाराज जोगी यांची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण होणार असून ज्ञानेश्वरी व्यासपिठप्रमुख माणिक दादा बिडगर आहेत. तसेच रोज रात्री परिसरातील नामवंत किर्तनकारांची किर्तने होणार आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमात व सामुहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयात परिसरातील भाविकांनी सहभागी व्हावे असेआवाहन राधाबाई बियाणी, चंदुलाल बियाणी, सतिश बियाणी, सप्ताहाचे संयोजक तथा अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, तालुका सचिव ह.भ.प.विश्वास महाराज पांडे यंानी केले आहे.
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments