Header Ads Widget

Responsive Advertisement

परळी शहरातील अवैध दारू, गुटखा व मटका त्वरीत बंंद करा- भीम आर्मी


परळी (प्रतिनिधी) ः परळी शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू आहे. या अवैध दारू, गुटखा व मटका माफिया यांचे धंद्याचे दुकान सर्रास चालु आहे. हे परळी शहर व संभाजी नगर पोलिस स्टेशन परळीच्या हददीतील पोलीस प्रशासन उघडया डोळयाने पाहात असून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची लेखी तक्रार दि.15/06/2018 रोजी  बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिली आहे. अवैध धंदयावाल्यांकडून मोठया प्रमाणात अर्थिक व्यवहार घडत आहे. पोलीस प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावल्यास गोरगरीब लोकांचे संसार उध्वस्त होणार नाहीत. जो व्यक्ती दारू पितो किंवा त्याच्या व्यसन पुर्ण करण्यासाठी समाजात खोटे बोलणे, चोरी करणे, लोकांना फसवून हिंसक बनणे आदि प्रकार होतात. त्यामुळे  कायदा व सुव्यवस्था परळी व परिसरात अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने इमानदारीने कर्तव्य बजवावे अन्यथा या अवैध धंदयांना वेसन घालण्यासाठी व गोरगरीबांचे संसाराचे संरक्षण करण्यासाठी भीम आर्मी परळी शाखेच्यावतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असे गर्भित इशारा भीम आर्मीचे शहराध्यक्ष राम भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. 

Post a Comment

0 Comments