याकार्याची प्रेरणा घेऊन सुद्धा अशा गोरगरिबांसाठी असलेले वैजनाथ देवस्थानचे  देवल कमिटी अन्नछत्र  एक वेळ का होईना जेवण देऊन सुरू ठेवावे अशी मागणी  लोकांमधून होत आहे 
परळीत सध्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज पासून 21 दिवस लॉक डाऊन सुरू केले आहे.अश्या परिस्थितीत  जनतेने आपल्या घरांची दारे ही बंद केली आहे अश्यात ज्यांना घरे नाहीत त्यांच्या साठी परळीतील वैधनाथ मंदिराच्या पायऱ्याच एक सहारा आहे  मात्र सध्या वैधनाथ मंदिर ही बंद असल्यामुळे या बेसहारा लोकांना जगण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आणि अश्या बिकट परिस्थितीत एक दिलासा फाउंडेशनच्या वतीने या बेसहारा लोकांचा सहारा बनून समोर आले आणि या लोकांना आज पासून 21 दिवस दोन वेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे .एक दिलासा फाउंडेशनच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही.
ज्या ज्या ठिकाणी अश्या बेसहारा लोकांना अनछत्र पुरवले तर कोरोनाला हद्दपार करीत आपण या ही लोकांचे प्राण निश्चित वाचवू शकू.आशा उद्देशाने अनेक सेवा भावी संस्थाने समोर येण्याची गरज आहे.आज निर्माण झाली आहे.